मुलतानी माती त्वचेच्या रक्षणासाठी…

त्वचेचं संरक्षण करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करून आपण घरातल्या घरातही सुलभतेने सौंदर्योपचार करून आपली त्वचा आकर्षक करू शकता. मुलतानी माती हा एक नैसर्गिक फेसपॅकच आहे. ती लावल्यामुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ, सौम्य व आकर्षक बनते. मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचा चमकदार, स्वच्छ सुंदर होतेच आणि तिला संरक्षक कवचही प्राप्त होतं. ही माती म्हणजे एक प्रकारे लाभदायक ऍण्टिसेप्टिक फेसपॅकही आहे. कारण ती लावल्यामुळे मुरमं, चेहऱ्यावरील डाग वगैरे नाहीसे होतात. कोणत्याही वयात मुलतानी मातीचा वापर करता येतो. तिच्या वापरामुळे त्वचेमध्ये मोहकपणा व रंगात निर्मळता दिसू लागते. मुलतानी माती त्वचेच्या बाबतीत नैसर्गिक क्‍लीन्सरचं कार्यही करते.

मुलतानी मातीत पोषक घटक आढळतात. त्यांच्यामुळे ती त्वचा केवळ स्वच्छ व सुंदरच बनवित नाही तर त्वचेचं संरक्षणही करते.’ मुलतानी मातीत खालील पोषक घटक आढळतात. मॉइश्‍चरायझर 13.1 टक्‍के, तेल 4.47 टक्‍के, प्रोटिन 6.3 टक्‍के, मेद (चरबी) 5.1 टक्‍के, कार्बोहायड्रेट 9.4 टक्‍के, खनिज क्षार 13.33 टक्‍के शिवाय जीवनसत्त्व “ए’ व “ई’ ही देखील मुलतानी मातीत असतात. उन्हामध्ये काळवंडलेल्या सावळ्या त्वचेचं रंगरूपही मुलतानी माती उजळवून स्वच्छ व कांतिमान बनवते. या मातीतील “ए’ व “ई’ जीवनसत्त्वांमुळे त्वचेचा सुरकुत्यांपासून बचाव होतो. या मातीच्या नियमित वापरामुळे रंगरूप उजळू लागतं.’ अशा प्रकारे वरील गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही घरातल्या घरातच मुलतानी मातीच्या सहाय्याने सौंदर्योपचार करून तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता.

खालील उपचार करा…
– चेहऱ्यावर मुरमं झाली असल्यास मुलतानी माती वाटून दोन छोटे चमचे मुलतानी माती, एक छोटा चमचा लिंबाचा रस, एक छोटा चमचा बेसन व चिमूटभर हळदीची पूड मिसळून पेस्ट बनवा. मुरमं झालेल्या त्वचेवर या मातीचा लेप आठवड्यातून दोन वेळा लावा. त्यामुळे त्वचा निरोगी व स्वच्छ होईल आणि मुरमंदेखील नाहीशी होतील.

– उन्हात फिरल्यामुळे चेहऱ्याबरोबरच शरीरावरील त्वचाही काळी पडू लागते. हा काळसरपणा नाहीसा करण्यासाठी दोन छोटे चमचे मुलतानी माती, एक छोटा चमचा दुधाची साय, एक छोटा चमचा राईचं तेल, चिमूटभर हळदीची पूड व एक छोटा चमचा बेसन मिसळून उटणं तयार करा. स्नानापूर्वी ते अंगाला लावा आणि अंग घासून स्वच्छ करा. त्यामुळे सुरकुत्या सावळेपणा, डाग नाहीसे होतीलच परंतु त्याचबरोबर त्वचा चमकदार, कांतिमान, एकदम स्वच्छ, सुंदर व गोरी होईल.

– दोन मोठे चमचे मुलतानी मातीत एक मोठा चमचा दही मिसळून पेस्ट बनवा. ती पेस्ट वीस मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. ती सुकल्यावर थंड पाण्याने धुऊन टाका. त्यामुळे त्वचा स्वच्छ होईलच, परंतु ती तजेलदार व मोहकही होईल. चेहऱ्याचं सुरकत्यांपासून संरक्षण करण्यासाठी चार-पाच बदाम वाटून त्यात चार छोटे चमचे मुलतानी मातीमध्ये तीन छोटे चमचे गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करून ती आठवड्यातून दोन वेळा लावा. त्यामुळे मुरमं, डाग वगैरे नाहीसे होतील. त्वचा रोगमुक्त होण्याबरोबर ती कांतिमान होईल.

– सुजाता टिकेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)