• थेरगाव येथील धक्‍कादायक प्रकार

पिंपरी (प्रतिनिधी) – पोटात मुलीचा गर्भ वाढत आहे, असा कयास बांधून सुनेचा छळ करण्यात आला. पोटात वाढणा-या कळीला जन्मापूर्वीच मारण्यासाठी सासरच्या मंडळींनी महिलेच्या पाठीत आणि पोटात लाथा मारल्या. हा प्रकार थेरगाव येथे घडला.

स्वाती संजय पवार (वय 24, रा. कैलास नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती संजय पांडुरंग पवार (वय 31, रा. कैलास नगर, थेरगाव), सासू सुमन पांडुरंग पवार आणि नणंद अर्चना हर्षद यादव (दोघी रा. वाटंबरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि संजय थेरगाव मधील कैलासनगर येथे भाड्याने राहतात. पौर्णिमेच्या रात्री स्वाती गरोदर राहिली. जी महिला पौर्णिमेच्या रात्री गरोदर राहते, तिच्या पोटी मुलगी जन्म घेते. या अंधश्रद्धेतून आणि वंशाला दिवा हवा असल्याच्या हव्यासातून मागील काही दिवसांपासून स्वाती यांच्या सासू आणि नणंद दोघीही वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करत होत्या.

शनिवारी रात्री पती, सासू आणि नणंद यांनी गर्भपात करण्याच्या कारणावरून स्वाती पाठीत आणि पोटात लाथा मारल्या. पोटातील जीव जिवंत राहण्यासाठी तळमळणा-या आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठले. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अदयाप अटक करण्यात आली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)