मुऱ्हेवस्तीत गौरींचे थाटात आगमन

चिंबळी-कुरूळी, चिंबळी परिसरात गौरींचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. येथील महिलांनी परंपरेनुसार शनिवारी (दि. 15) सायंकाळी गौरींची उत्साहात प्राणप्रतिष्ठा करून सुवासनिंनी हळदीकुंकू वाहुन गौरीपूजन केले. कुरूळी (मुऱ्हेवस्ती) येथील हर्षदा मुऱ्हे व संपदा मुऱ्हे यांनी गेल्या चाळीस वर्षांपासूनची परंपरा जतन करत शनिवारी (दिफ 15) परंपरेनुसार गौरी पुजन केले. त्यांच्याभोवती आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करून गौरीना अलकांर परिधान करून मोठ्या थाटामाटात पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला. दुसऱ्या दिवशी विविध फळे व पदार्थ ठेवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत महिलांना बोलावून हळदीकुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करून गौरी गणपतीचा सण मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील सर्व नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. तर पुष्पाजंली किरण मुऱ्हे (मुऱ्हेवस्ती) या भगिनीने सुद्धा गेले आठ वर्षांपासूनची परंपरा जतन करत गौरींची मोठ्या आनंदमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा केली. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट करून विविध प्रकारच्या फळाची ताटे मांडून पदार्थ ठेवण्यात आले. महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)