मुर्शतपूरच्या उपसरपंचपदी अजित माळी

कोल्हे गटाकडून सत्ता हस्तगत करण्यात काळे गट यशस्वी

कोपरगाव – मुर्शतपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजित सुधाकर माळी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राजकीयदृष्टया अतिशय महत्वाच्या असणाऱ्या मुर्शतपूरच्या ग्रामपंचायतीची निवडणूक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा पराभव करून या ग्रामपंचायतीवर काळे गटाने सत्ता मिळवली. सरपंचपदी काळे साधना दवंगे या प्रथमच जनतेतून निवडून येवून सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. उपसरपंचपदासाठीची निवडणूक सरपंच दवंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपसरपंचपदासाठी अजित माळी यांचा एकमेव अर्ज आला. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक आढाव व सहायक निवडणूक अधिकारी ग्रामसेवक सुनील रजपूत यांनी माळी यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी काळे कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे, भाऊसाहेब शिंदे, दत्तात्रय आरोटे, रामभाऊ शिंदे, नितीन शिंदे, डॉ. अनिल दवंगे, अजित जावळे, सीताराम शिंदे, संदीप बारवकर, दिगंबर शिंदे, सुनील गिरमे, रोहिदास मोरे, सुलतान शेख, शांतिलाल शिंदे, लीलाबाई गुजांळ, नवनिर्वाचित सदस्य प्रवीण गुजांळ, कल्पना थोरात, सुरेखा मोरे, रंजना बारवकर, मनीषा गिरमे, चंद्रकांत दवंगे, शोभा बारहाते आदी उपस्थित होते. माळी यांचे माजी आमदार अशोकराव काळे, कोपरगाव तालुक्‍याचे युवा नेते आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल माळी यांनी सर्वांचे आभार मानले. मुर्शतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी योगदान देवून आपली निवड सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी नितीन शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले तर ग्रामसेवक सुनील राजपूत यांनी उपस्थितांचे आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)