मुबिया कंपनीकडून केरळ पूरग्रस्तांना मदत

पिरंगुट- सामाजिक बांधिलकी जपत पिरंगुट (ता. मुळशी) येथील मुबिया कंपनीने केरळ पुराग्रस्तांसाठी मदत देऊ केली आहे. नेहमी मदत करण्यास तत्पर असलेल्या मुबिया फॅंमिली मधील मुबिया कंपनीतील कर्मचारी आणि स्वतः कंपनीच्या वतीने केरळ येथील पूरग्रस्तांना मदत करीत औद्योगिक क्षेत्रातील इतर कंपन्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे.
नुकताच केरळ येथे महापूर आल्याने अनेकांचे कुटुंब उद्‌धवस्त झाली आहेत. त्यामुळे मुबिया कंपनीमधील काम करीत असलेले कर्मचारी यांनी आपल्या वेतनातील काही रक्कम त्याच प्रमाणे स्वतः मुबिया कंपनीने भरघोस अशी रक्कम देत केरळ येथील पूरग्रस्तांना मदत केली. तेथील पूरग्रस्त नागरिकाला निवाऱ्यासाठी दोन चादर, अन्न-धान्य म्हणून तांदुळ, तूरडाळ, साखर, चहा पावडर, आंघोळीचे आणि कपड्यांचे साबण यांसह इतर अशा दैनंदिन तसेच गरजू वस्तू एका बॅगमध्ये बांधून सुमारे तीनशे ते साडेतीनशे बॅग खरोखरच गरजू आणि पूरग्रस्तांना पोहोचल्या पाहिजेत. यासाठी कंपनीने स्वखर्चाने एक मालगाडी भाड्याने करून त्या सर्व वस्तू केरळमध्ये पाठवून दिल्या आहेत.
एवढ्यावरच न थांबता कंपनीने आपले प्रतिनिधी म्हणून लक्ष्मण कारभारी आणि विजय पाटील या दोन कर्मचाऱ्यांना केरळमध्ये पाठवून दिले आहेत. ज्या ठिकाणी पुरामुळे अनेकांचे संसार उद्‌धवस्त झालेले आहेत. ज्यांना खरोखरच या मदतीची गरज आहे. त्या ठिकाणी जाऊन सर्व वस्तू पोहोचवल्या जाणार आहे. मुबिया कंपनीच्या या मदतीचे येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये कौतुक होत आहे. या सर्व कार्यामध्ये कंपनीचे कार्यकारी अधिकारी के. डी. सिंग आणि त्यांच्या सहकारी वर्गाचा मोलाचा मोठा वाटा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)