मुन्ना यादवची मुले पोलिसांना शरण

नागपूर : मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या भाजप नेता मुन्ना यादवची मुलं  पोलिसांना शरण आली आहेत.  करण यादव आणि अर्जुन यादव अशी त्यांची नावे असून, त्यांनी धंतोली पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काही दिवसांपूर्वी नागपूरमधील अजनी परिसरात मुन्ना यादव आणि मंगल यादव यांच्या कार्यकर्त्यात तुंबळ हाणामारी झाली होती. लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड्स आणि तलवारीने एकमेकांवर जीवघेणे हल्ले झाले होते. यात दोन्ही गटातील दहा जण गंभीर जखमी झाल्याने, पोलिसांनी त्याच्याविरोधात  गुन्हा नोंदवला होता. तेव्हापासून तो आणि त्याचे साथीदार फरार आहेत. दरम्यान काल त्याच्या दोन्ही मुलांनी शरणागती पत्करल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र जरी मुन्ना यादवची मुलं पोलिसांना शरण आली असली तरी देखील तो आणि त्याचा भाऊ अद्याप फरार आहेत.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)