“मुन्ना भाई’च्या सीक्वलची उत्सुकता

संजय दत्तच्या जीवनात आणि चित्रपट कारकिर्दीत “मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि “लगे रहो मुन्ना भाई’ या दोन्ही चित्रपटाचे वेगळेच महत्त्व आहे. राजकुमार हिरानी द्वारा दिग्दर्शीत “मुन्ना भाई एमबीबीएस’ हा 2003मध्ये, तर 2006मध्ये याचा सीक्वल “लगे रहो मुन्नाभाई’ प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले होते. आता या चित्रपटाच्या पुढील सीक्वलबाबत सर्वांना खूपच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात संजय दत्त पुन्हा मुरली प्रसादच्या भुमिका साकारणार आहे.

“भूमी’चा ट्रेलर लॉंचच्याप्रसंगी संजयला “मुन्ना भाई-3’बाबत विचारले असता विधु विनोद चोपडा म्हणाले की, सध्या चित्रपटाच्या कथानकाचे लिखान सुरू असून अभिजात जोशी तीन वर्षांपासून त्यावर काम करत आहेत. त्यामुळे स्क्रिप्ट पूर्ण होताच चित्रपटावर काम करण्यास सुरूवात करू, असे चोपडा यांनी सांगितले.

राजू आणि अभिजात यांनी मला उत्कृष्ट चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. ती म्हणजे, मुन्ना भाई… “भूमी’नंतर मी फक्त “मुन्नाभाई-3′ चित्रपटावर लक्ष्य केंद्रीत करणार आहे, असे संजय दत्त याने सांगितले. दरम्यान, अरशद वारसी याने मुन्नाभाईच्या सीरीजबाबत सुरू असलेल्या चर्चेला दुजोरा दिला आहे. राजकुमार हिरानीसोबत भेट झाली असून त्यांनी लवकरच चित्रपटाचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे, असे अरशद वारसी याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)