मुधोजी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

1990 च्या बॅचचे विद्यार्थी कास पठारावर एकत्र

फलटण  – सातारा नजीक कास पठार येथील येथे मुधोजी हायस्कूल फलटण येथील 1990 साली जी मुले आणि मुली 10 मध्ये होती त्यांचा स्नेहसंमेलनांचा कार्यक्रम पार पडला. तब्बल 28 वर्षानी भेट झाल्याने यावेळी झालेल्या भेटीचा आनन्द सर्वांच्या गगनात मावत नव्हता. अनेकांना यानिमित्ताने आनंदाश्रु आवरता आले नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण शहरातील मुधोजी हायस्कूल हे नामांकित व ऐतिहासिक वारसा लाभलेले हायस्कूल आहे या शाळेतील 1990 साली इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या पाचही तुकड्यातील सर्व मुले- मुलींना एकत्र आणण्याचा संकल्प काहीनी केला. अनेकांचे पत्ते फोन नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. या सर्वांचा व्हॉट्‌स ऍप ग्रुप बनविण्यात आला. यावेळी चर्चेअंती सर्वानी भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सातारा येथील निसर्गरम्य अशा कास पठाराची निवड करण्यात आली. तेथील सर्व नियोजनाची जवाबदारी सातारामधील कौस्तुभ बेडकीहाळ, राजश्री चाफळकर-देशपांडे,मंदाकिनी माने, राणी करवा- मुंदड़ा, झरीन शेख यांनी उचलून सर्वांशी सातत्याने संपर्क ठेऊन चांगले नियोजन केले.

28 वर्षानी एकत्र आलेल्या शालेय मित्र- मैत्रिणीनी आपसातील सुख -दुःखांची देवाणघेवण केली. अनेक मित्रमैत्रीण उच्चपदावर असल्याचे पाहून आनंद व्यक्त करण्यात आला. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत गप्पाटप्पा, ओळख परेड, जुन्या आठवणी, मनोरंजक खेळ, भावगीते,हिंदी चित्रपटातील गाणी असा गेट टुगेदरचा कार्यक्रम रंगला. सायंकाळी सर्वांनी जड़ अंतःकरणांनी एकमेकांना निरोप देताना दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भेटण्याचा पण केलाच. पण यापुढे सर्व सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचाही निर्णय घेतला. या स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून आणि बाहेरील राज्यातुंनही मित्रमैत्रीण आले होते. पुढील संमेलन मुंबई येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांचे स्वागत सातारी कंदी पेढ़े देऊन आणि फेटा बांधून करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)