मुद्रा योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न 

नवी दिल्ली – मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वितरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फ्लिपकार्ट, पतंजली, अमूल आणि स्विगी यासारख्या 40 कंपन्यांबरोबर अर्थ मंत्रालय भागीदारी करणार आहे. सध्या या कंपन्यांकडून मोठया प्रमाणात रोजगार देण्यात येत आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देण्यासाठी नवउद्यमींची निवड करण्यासाठी अर्थमंत्रालयाने 23 मे रोजी मुंबईत कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी जास्तीत जास्त लोकांना कर्ज वितरित करण्यात येणार आहे.

देशात मोठया प्रमाणात रोजगारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. ज्या लोकांना मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची आवश्‍यकता आहे, अशा लोकांची निवड या कंपन्या करणार आहेत. त्यांच्यासाठी कर्जाची हमी सरकारकडून देण्यात येईल आणि या योजनेतून कर्ज देण्यात येईल. ज्या लोकांना कर्जाची आवश्‍यकता आहे, ते बॅंकांशी संपर्क साधू शकतात. या योजनेमध्ये मेकमायट्रिप, झोमाटो, मेरू कॅब, मुथ्थूट, एडलवाईज, ऍमेझॉन, ओला, बिग बास्केट, कार्ज ऑन रेन्ट आणि हबीब सलून यांचा समावेश आहे. तरुण उद्योजकांना भांडवल पुरवठा करण्यासाठी सुरू केलेली ही योजना गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)