मुद्रांक शुल्क थकीत निधीसाठी वित्तमंत्र्यांची भेट घेणार – विश्‍वास देवकाते

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.31 – राज्य शासनाकडे मुद्रांक शुल्कची 290 कोटी रुपयांची थकबाकी आहे. हा निधी अद्याप जिल्हा परिषदेला न मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे विकासकामे संथ गतीने सुरू आहे; तर नवीन कामांचे नियोजन रखडले आहे. यामुळे शासनाकडून मुद्रांक शुल्कचा निधी तत्काळ जिल्हा परिषदेला मिळावा, यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिली.

जिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या प्रमाणानुसार राज्य सरकारकडून एक टक्के मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला दिले जाते. या मिळणाऱ्या एकूण मुद्रांक शुल्काचा निधी जिल्हा परिषदेला आणि ग्रामपंचायतींना विभागून दिला जातो. ग्रामपंचायतींना दिली जाणारी रक्कम ही संबंधीत गावाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या प्रमाणानुसार दिली जाते. जिल्हा परिषदेने 2016-17 चे अंतिम अंदात्रपत्रक 215 कोटी 20 लाखांचे होते. मुद्रांक शुल्क विभागाकडून जिल्हा परिषदेला 189 कोटी 57 लाख 75 हजार रुपये येणे बाकी आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा 2017-18 चे मुळ अंदाजपत्रक फक्त 168 कोटी 70 लाखांचे झाले आहे. या अंदाजपत्रकामध्ये 2016-17 वर्षा पेक्षा जवळपास 70 कोटींची त्रुट आहे. निधीची कमतरता असल्याने मुळ अंदाजपत्रकामध्ये अनेक विभागांचा निधी कमी करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्कची ही थकीत रक्कम आता 290 कोटींवर पोहोचली आहे.

-Ads-

या थकबाकीचा परिणाम आगामी 2018-19 च्या अंदाजपत्रकावर होणार आहे. याबाबत देवकाते यांनी सांगितले, राज्य शासनाने मुद्रांक शुल्क विभागाचे थकीत रक्कम दिल्यानंतर विकास कामे करण्यासाठी गती येणार आहे. नाविण्य पूर्ण योजना राबिण्याचे नियोजन करता येणार आहे. राज्य शासनाकडून थकीत रक्कम लवकरात लवकर दिली जाईल असे आश्‍वासन यापूर्वी सर्व मंत्र्यांनी दिले आहे. मात्र, अद्याप निधी दिला नाही. दरम्यान, याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांची भेट घेतली आहे; तर गुरुवारी (दि.1) वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार पुणे दौऱ्यावर असून, त्याबाबत त्यांची भेट घेणार आहे, अशी माहिती देवकाते यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)