मुद्रांक शुल्काचे आणखी 19 कोटी तिजोरीत

1 टक्के अनुदान नेमके कशाचे?
राज्यशासनाने जकात बंद केल्यानंतर एलबीटी लागू केला. मात्र, एलबीटीमुळे उत्पन्न कमी होणार असल्याने मुद्रांक शुल्कापोटी होणाऱ्या 1 टक्के अधिभार लावत हे शुल्क महापालिकांना त्यांच्या हिश्‍श्‍याप्रमाणे देण्यात येत होते. त्यानंतर मागील वर्षी जीएसटी आल्याने महापालिकेस जीएसटी अनुदान म्हणून प्रतिपूर्तीची रक्कम देण्यात होती. ही रक्कम आठ महिने दिल्यानंतर आता शासनाने अचानक या अनुदानात बदल करून महापालिकेस दिले जाणारे अनुदान हे प्रतिपूर्ती अनुदान म्हणून न देता, ते मुद्रांक शुल्क अधिभार रक्कम म्हणून दिले आहे. त्यामुळे या एलबीटीसाठी आकारले जाणारा 1 टक्के मुद्रांक शुल्काचा अधिभार यापुढे जीएसटी अनुदानाच्या प्रतिपूर्तीसाठी वापरला जाणार आहे. ही रक्कमही नागरिकांच्या खिशातूनच वसूल केली जात आहे.

महापालिका एलबीटी विभागाचे उत्पन्न 1,717 कोटींवर

पुणे – राज्यशासनाने मुद्रांकशुल्कावर लावलेल्या 1 टक्का अधिभाराची सुमारे 19 कोटी रुपयांची रक्कम महापालिकेस मंजूर केली आहे. त्यामुळे स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाचे उत्पन्न मार्चअखेरीस 1,717 कोटींवर पोहचले आहे.

एलबीटी विभागास स्थायी समितीच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात सुमारे 1,730 कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. या विभागाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट 98 टक्के पूर्ण झाले आहे. मिळकतकर, बांधकाम विभागाचे घटलेले उत्पन्न या पार्श्‍वभूमीवर शासन अनुदानामुळे महापालिकेस मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

जीएसटी लागू केल्यानंतर महापालिकांचा उत्पन्नाचा स्रोत असलेला एलबीटी बंद करण्यात आला. त्यामुळे आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी राज्यशासनाने पुणे महापालिकेस 137 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान निश्‍चित केले होते. हे अनुदान आतापर्यंत जीएसटीपोटी येत असताना मार्चमधील अनुदान महापालिकेस मुद्रांक शुल्काचा 1 टक्के अधिभार म्हणून देण्यात आले. त्यामुळे शासनाकडून यापुढे येणारे अनुदान कोणत्या स्वरूपात येणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, याच महिन्यात शासनाने पुन्हा एकदा 1 टक्के अधिकाराची 19 कोटींची रक्कम महापलिकेस मंजूर केली आहे. त्यामुळे या महिन्यात पालिकेच्या तिजोरीत 1 टक्के अधिभारपोटी तब्बल 156 कोटींचा महसूल जमा झाल्याचे एलबीटी विभागप्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)