मुदतीपूर्वी साकारणार ‘सर्वांसाठी घर’

देशात सुमारे 1.2 कोटी घरांची निर्मिती 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले होते. परंतु हे लक्ष्य मुदतीच्या दोन वर्षे आधीच पूर्ण होईल, असा दावा सरकारने केला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी नुकतेच असे सांगितले की, पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत (पीएमएवाय) सर्व गरजूंना घर देण्याचे लक्ष्य 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. परंतु सध्याचा वेग पाहता दोन वर्षे आधीच हे उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी शक्‍यता आहे. या योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी अनेक गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली जात असून, मंजूर झालेल्या योजनांचे कामही सुनियोजित पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय शहरी घरकुल निधीअंतर्गत पीएमएवाय योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करून 60 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

त्यांनी असेही सांगितले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, दरमहा दोन ते तीन लाख घरांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात येत आहे. देशभरात सुमारे 1.2 कोटी घरांची कमतरता असून, ती पूर्ण करण्याचे आणि सर्वांन घर मिळवून देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. 2022 मध्ये देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत आहे. त्यावेळी देशातील प्रत्येक कुटुंबाकडे हक्काचे घर असावे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

ईशान्येकडील आठ राज्यांमध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाच्या पाच प्रमुख कार्यक्रमांची पाहणी केल्यानंतर पुरी यांनी सांगितले की, पीएमएवाय योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी आणखी 2.3 लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आशियाई विकास बॅंकेकडून 400 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे, अशी माहितीही पुरी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)