मुथाळणे येथे 90 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

ओतूर -मुथाळणे (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वीच्या एकूण 90 विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. हभप सर्जेराव गाढवे, उद्योजक गिरीष डांग व पुणेकर मित्रमंडळ यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी बोलताना गाढवे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता एकंदरीत शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्‍त केले. त्यांच्यासमवेत आलेल्या पुणेकर मित्रमंडळींनी शालेय परिसरातील कुपनलिकेत विद्युतपंप बसविण्याचे आश्‍वासन दिले. या कार्यक्रम प्रसंगी उद्योजक गिरीश डांग, सचिन मंडलिक, स्नेहल लुणावत, योगेश कुलकर्णी, राजेश शेट्ये, मंगेश देसाई, आनंद जाधव, संदीप प्रधान, बाबुराव काळे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पोकळे, ठमाती कवटे, युवराज डामसे यांचे सहकार्य लाभले. या कार्यकमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र डुंबरे यांनी केले. सूत्रसंचालन वनिता जाधव व विजय नांगरे यांनी केले. तर मंगेश देवगिरे यांनी आभार मानले. यावेळी ओतूर येथील दंतवैद्यक डॉ. सविता फलके यांच्यावतीने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे टुथपेस्ट व ब्रश किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली डुंबरे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)