मुथाळणे परिसरात गोवर-रुबेला लसीकरण

ओतूर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुथाळणे, मांडवे, पुताची वाडी, शासकीय आश्रमशाळा, मुथाळणे तसेच अंगणवाडी मुथाळणे, मांडवे, पुताची वाडी येथे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम उद्‌घाटन आणि प्रत्यक्ष लसीकरण बुधवारी (दि. 12) करण्यात आले. या वेळी शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य मिळाले. लसीकरण ठिकाणी मढचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शाम बनकर आणि तांबे यांनी, तसेच जुन्नर तालुक्‍याचे गट शिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी भेट देऊन सत्राची पाहणी केली व टीम ला मार्गदशन केले तसेच विद्यार्थ्यांना लसीकरण प्रमाणपत्रे वाटप केली. यावेळी आरोग्य सेविका एस.एम. बनकर, पी.सी. रोकडे, मुथाळणे संजय पोकळे, मुथाळणेचे सरपंच योगिता दाभाडे, उपसरपंच पारूबाई ठोंगिरे, रामचंद्र ठोंगिरे, गटप्रवर्तक सुरेखा दिघे, मुख्याध्यापिका सुशिला डुंबरे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ती, गट प्रवर्तक यांचे सहकार्य मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)