मुठा खोऱ्यात राष्ट्रवादीकडून सर्वाधिक निधी – प्रा. दगडे

पिरंगुट- मुठा खोऱ्यात विकासाची गंगा आणण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून झालेले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीजास्त निधी देण्याच्या प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे यांनी केले.
कोळावडे (ता. मुळशी) येथे जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे व पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे यांच्या फंडातून साडेतीन लाख रूपये खर्च करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजन प्रसंगी दगडे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, माजी तालुका अध्यक्ष सुनील चांदेरे, पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे, तालुका सरचिटणीस माऊली कांबळे, माजी सरपंच अंकुश उभे, दत्तात्रय उभे, सुहास दगडे, भारतीय विमा महामंडळाच्या अधिकारी मंगला सुर्वे, देवेंद्र सोरटे, श्रीकांत मुजुमदार, सरपंच सयाजी आढाव, उपसरपंच स्वाती येनपुरे, पोलीस पाटील विजय उभे, संतोष गुंड, बबन मारणे, तुकाराम मरे व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सयाजी आढाव यांचे पुढाकारातुन गावाला आदर्श बीमा ग्रामचा रोख पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार यावेळी वीमा महामंडळाच्या प्रबंध अधिकारी मंगला सुर्वे यांचे हस्ते देण्यात आला. प्राथमिक शाळेला ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी संगणक देण्यात आला. तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोळावडे गावाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सुनील चांदेरे म्हणाले, धावपळीच्या व धकाधकीच्या युगात प्रत्येकाचा वीमा उतरवणे ही काळाची गरज आहे. प्रास्ताविक सरपंच सयाजी आढाव यांनी केले. सूत्रसंचालन नाईकरे यांनी केले. अंकुश येनपुरे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)