मुठा कालवा आपद्‌ग्रस्तांसाठी 3 कोटींची मदत

पुरामुळे 98 घरे उद्‌ध्वस्त

पुणे – येथील दांडेकर पूलाजवळील मुठा कालवा फुटल्याने या भागातील नागरिकांना पुर परिस्थितीचा सामना करावा लागला. येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पुरग्रस्तांना आज राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या आपद्‌ग्रस्तांसाठी 3 कोटी रूपयांचा मदत निधी देण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या आठवड्यात मुठा कालाव फुटून दांडेकर पुलाजवळील परिसर जलमय झाला. या परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात आलेल्या पुरामुळे 98 घरे पूर्णत: उद्‌ध्वस्त झाली आहेत. तर 400 ते 500 घरांचे कमी-अधिक प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. ते लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक महिन्याचे धान्य ही नुकसानग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)