मुळा-मुठा उजवा कालवा बाधितांच्या पुनर्वसनासाठी 3 कोटी मंजूर: गिरीश बापट

पुणे – सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ मुठा कालवा फुटल्याने लोकवस्तीमध्ये पाणी शिरले आहे. ज्या झोपडपट्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्याभागात पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना लवकरच मदत करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते.

दरम्यान, गिरीश बापट यांनी मुठा उजवा कालवा बाधितांना मदत मिळावी यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यानी बाधितांच्या पुनर्वसनासाठी तातडीने 3 कोटी मदतनिधी देण्याचे मंजूर केले. ज्या नागरिकांचे सिलेंडर वाहून गेले त्यांना सीएसआर मधून ते उपलब्ध करून देण्यात येतील. या नागरिकांचे कायम स्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)