मुटकेवाडी येथून कामगार बेपत्ता

वाकी -घरात कोणाला काही न सांगता मुटकेवाडी (ता. खेड) येथून गेल्या पंधरा दिवसांपासून कामगार निघून गेला असून, परत तो माघारी आला नसल्याने तो अद्याप आहे.
समाधान दिनकर खरात (वय 26, सध्या रा. दत्तात्रय भूरूक यांची भाड्याची खोली, मुटकेवाडी, ता. खेड) असे बेपत्ता झालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. त्याचा भाऊ संतोष दिनकर खरात (वय 29, सध्या रा. नाना मुटके यांची खोली, मुटकेवाडी, ता. खेड; मूळ रा. हनवतखेडा, ता. मंठा, जि. जालना) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समाधान हा घरात कोणाला काही न सांगता मुटकेवाडी येथून 26 जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान निघून गेला आहे. तेव्हापासून तो परत घरी आला नाही. समाधान याचे शिक्षण दहावी, रंग सावळा, मराठी भाषा लिहिता वाचता येते, डोक्‍याचे केस काळे, डोळे काळे, उंची पाच फुट, असे त्याचे वर्णन आहे. या वर्णनाच्या तरुण कामगाराबद्दल कोणाला काही माहिती असल्यास अथवा कोठे आढळल्यास त्यांनी ताबडतोब चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क (02135 – 249333) साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, हवालदार मुश्‍ताक शेख, सुभाष पवार व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)