मुख आरोग्य आणि मधुमेह

रक्तशर्करेच्या पातळ्यांचे नियंत्रण नीट न केल्यास तुम्हाला हिरड्यांचे आजार होण्याची खूप शक्‍यता असते. दातांची झीज, तोंड कोरडे होणे, तोंडात बुरशीजन्य पदार्थ जमा होणे यासारखे विकार होण्याची शक्‍यता असते. 27 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान साजऱ्या केल्या जात असलेल्या जागतिक मुख आरोग्य सप्ताहानिमित्त मधुमेहाचा आणि मुखाच्या आरोग्याचा संबंध जाणून घेऊ या.

मधुमेह हा एका विषासारखा आजार असून तो विविध अवयवांवर परिणाम करतो आणि आरोग्याचे इतर प्रश्‍नही त्यामुळे भेडसावतात. नंतरच्या टप्प्यांमध्ये हे आजार डोळे, मज्जाव्यवस्था, मूत्रपिंड आणि हृदय इत्यादींवर परिणाम करतात.

मधुमेह संसर्गाप्रती आपली प्रतिकारशक्ती कमी करतो आणि बरं होण्याच्या प्रक्रियेचा वेगही कमी करतो. तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्हाला हिरडयांचा त्रास होण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यामुळे आपल्याला रक्तशर्करेचं व्यवस्थापन करताना दात आणि हिरडयांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. रक्तशर्करेच्या पातळ्यांचे नियंत्रण नीट न केले गेल्यास तुम्हाला हिरडयांचे आजार होण्याची खूप शक्‍यता असते आणि मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत आपण जास्त दात गमावू शकता.

मधुमेहाशी संबंधित सर्वाधिक सर्वसामान्य मुख आरोग्य त्रास खालीलप्रमाणे आहेत
दातांची झीज : आहारातील आणि शीतपेयांमधील स्टार्च व साखर या जीवाणूंच्या संपर्कात येतात, तेव्हा प्लाक नावाचा चिकट पडदा तुमच्या दातांवर तयार होतो. प्लाकमधील आम्लं तुमच्या दाताच्या पृष्ठभागावर हल्ला करतात (इनॅमल आणि डेंटिन). यामुळे कीड लागण्याची शक्‍यता असते.

कोरडे तोंड : कोरडे तोंड हे तुमच्या तोंडातील ग्रंथींमधून (लाळग्रंथी) निर्माण होणाऱ्या लाळेच्या प्रमाणातील घट झाल्यामुळे होते आणि तो सामान्यत: औषधांचा साईड इफेक्‍ट असतो.

बुरशीजन्य संसर्ग : तोंडाची जळजळ मधुमेह असलेल्या लोकांना संसर्गाचा सामना करण्यासाठी सतत अँटिबायोटिक्‍स घ्याव्या लागतात. त्यामुळे त्यांना तोंडात आणि जिभेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्‍यता असते. ही बुरशी अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांच्या लाळेतील साखरेच्या उच्च प्रमाणावर जगतात. त्यामुळे तुमचे तोंड आणि जीभ जळजळू शकते.

कीड : तुम्हाला दंतक्षयामुळे कीड निर्माण होते. ती दाताच्या बाहेरील आवरण (ज्याला इनॅमल म्हणतात) आणि अंतर्गत आवरण (ज्याला डेंटिन म्हणतात) त्यावरही परिणाम करू शकते.

हिरडयांची सूज : ही जीभ, हिरडया, ओठ किंवा गालांच्या आत होते. ते अल्सर्स म्हणून किंवा तोंडात लाल-पांढरे चट्टे म्हणून दिसू शकतात.

अल्सर्स : या सामान्यत: लहान, वेदनादायी फोडी असतात, ज्या तुमच्या तोंडात किंवा तुमच्या हिरडयांच्या तळाशी होऊ शकतात. त्यामुळे खाणे, पिणे आणि बोलणे वेदनादायी होऊ शकते.

चवीतील अडथळे : हा सर्वात मोठा चवीतील अडथळा आहे, जो टिकून राहतो. सामान्यत: तुमच्या तोंडात काहीही नसले तरीही नकोसे वाटते. मऊ ब्रिसल्सचे टूथब्रश वापरा. दिवसातून एकदा तरी फ्लॉस करा. डेंचर्सचा वापर करत असल्यास ते रोज स्वच्छ करा. डेंचर्स लावून झोपू नका. धूम्रपानाच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. दर सहा महिन्यांनी नियमित तपासणीसाठी दंतवैद्यकाला भेट द्या. शक्‍य तितक्‍या नॉर्मल प्रमाणात रक्तशर्करेचे प्रमाण ठेवा.

डॉ. अमोल नायकवडी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)