मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांचा अल्पपरिचय…

मुंबई – दिनेश कुमार जैन हे मुळचे जयपूर, राजस्थान येथील आहेत. एम.टेक. मॅकॅनिकल इंजिनिअर, एम.बी.ए. असे त्यांचे शिक्षण झाले आहे. राज्य शासनाच्या प्रशासनात त्यांनी आतापर्यंत महत्वाच्या पदांवर काम केले असून, त्यांची पहिली पदस्थापना 1984 मध्ये धुळे येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर ते नाशिक, जळगाव, नागपूर, सोलापूर येथे त्यांनी विविध पदावर काम केले असून 1995 मध्ये केंद्र शासनाच्या सेवेत त्यांची नियुक्ती झाली. 2002 मध्ये नियोजन विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले.

2011 या कार्यकाळात केंद्र शासनात पंचायत राज मंत्रालयाचे सह सचिव म्हणून त्यांनी काम केले. जैन यांनी नरेगा-मध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांच्या कामाची दखल अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतली होती आणि त्यांना यासंदर्भात निमंत्रण देवून चर्चेसाठी बोलाविले होते.

2015 मध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. दिनांक 29 एप्रिल,2016 पासून ते वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)