मुख्य न्यायाधिश दिपक मिश्रांवर महाभियोग?

कॉंग्रेसची तयारी : विरोधी पक्षांना दिला प्रस्ताव
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधिशांकडून मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या कार्यशैलीवर प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर आता राजकीय पक्षांनीही मुख्य न्यायाधिशांविरोधात महाभियोग आणण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत कॉंग्रेस पक्षाने एक मसुदा तयार करून विरोधी पक्षांमध्ये वाटप केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य न्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यासाठी कॉंग्रेसने ज्येष्ठ नेत्यांसह कायदे तज्ज्ञांचे मत जाणून घेतले आहे. यात एका गटाने मिश्रांविरोधातील प्रस्तावाला समर्थन दिले, तर दुसरीकडे सध्या न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची आवश्‍यकता नसल्याचे नमूद केले होते. एका व्यक्‍तीसाठी संपूर्ण न्यायव्यवस्थेला वेठीस धरणे योग्य नसल्याचे मत त्यांनी दिले होते. त्यानंतर झालेल्या बैठकींच्या फेऱ्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्य न्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यास तयारी दर्शविली.

दरम्यान, एनसीपीचे वरिष्ठ नेते डी पी त्रिपाठी म्हणाले, मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावावर अनेक विरोधी पक्षांनी हस्ताक्षर केले आहे. आता टीएमसी आणि कॉंग्रेसकडूनही त्याला समर्थन मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)