मुख्याध्यापक बापूराव नवले यांना गुणवंत पुरस्काराने गौरव

नाणे मावळ – शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदकडून दिल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना गुणवंत पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) प्रदान करण्यात आला.

मावळ तालुक्‍यातील गोल्डन ग्लेड्‌स माध्यमिक विद्यालय करंजगावचे मुख्याध्यापक बापूराव नवले यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, शिक्षण विभागाचे सभापती व उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, वडगाव-खडकाळा गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, शिक्षण विभागाचे डॉ. गणपत मोरे, हारुण आतार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक बापूराव नवले हे गेली 20 वर्षे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वातून शाळेला आदर्श शाळेत पुरस्कार मिळाला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्थाचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.

पुरस्काराचे मानकरी…
मावळ तालुक्‍यातून खडकाळा उर्दू शाळेतील शिक्षिका नादेराबानो शेख यांची जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत पाच पेक्षा अधिक विद्यार्थी चमल्याने त्यांचा विशेष कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्रीकांत दळवी (साते), मनिषा गाडे (साते), अश्‍विनी पाटील व रघुनाथ मोरमारे यांनाही गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)