मुख्याध्यापक घोडे शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित

टाकळी हाजी- शिवनगर (डोंगरगण) (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब घोडे यांना “साने गुरुजी राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई संचलित 52 व्या अधिवेशनात प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती साने गुरुजी राष्ट्रस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. साने गुरुजी कथामाला अधिवेशनाचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे,समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, माजी आमदार गंगाधर पटणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख रक्‍कम, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी स्वागताध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी आमदार जयवंतराव ठाकरे, कार्यवाह शामराव कराळे, आंतरभारतीच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर उपस्थित होते. मुख्याध्यापक बाळासाहेब घोडे यांनी साने गुरुजी कथा मालेतर्फे शाळांमध्ये शाखाविस्तार केला.विद्यार्थांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासाबरोबर बालपिढीची जडणघडण व व्यक्तीमत्त्व विकासाचे उत्तम कार्य करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)