मुख्याध्यापक घाडगे यांना पी. एचडी

नारायणगाव -न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी कांदळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक घाडगे यांना जे. जे. टी. विश्वविद्यालय राजस्थान येथील पी. एचडी नुकतीच प्राप्त झाली.
डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. यशवंत पाटणे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावरील शोध प्रबंधास त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. जुन्नर तालुक्‍यातील ते अशी पदवी प्राप्त करणारे पहिलेच मुख्याध्यापक आहेत. यापूर्वी 2016-17चा कृतिशील मुख्याध्यापक या पुरस्कारानेही ते सन्मानित झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणपतराव फुलवडे, माजी सरपंच बाळासाहेब बढे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अशोक बढे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, तालुकाध्यक्ष तबाजी वागदरे, सचिव अशोक काकडे, अमीत बेनके, संग्राम फुलवडे, रामदास मोरे तसेच शिक्षण, अध्यात्म, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)