संगमनेर –  पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेले प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे रोपटे वाढत असताना  पद्मभुषन बाळासाहेब विखे पाटील यांनी जातीपातीच्या राजकारणाला कोठेही थारा दिला नाही. त्याच्याचं मार्गदर्शनाखाली शिर्डी मतदार संघात ३२ वर्ष संस्थेला आपले कुटुंब मानून प्रामाणिक सेवा करत विद्यार्थी घडवण्याचे काम मुख्याध्यापक मधुकर गायकवाड यांनी केले आहे. असे गौरोउदगार जिल्हापरिषद अध्यक्षा  शालिनीताई विखे पाटील यांनी काढले आहेत.

संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे मुख्याध्यापक मधुकर विठ्ठलराव गायकवाड यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ भुसाळ होते. विखे पाटील कारखाण्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई निघुते, शैलजाताई नावदंर, मुख्याध्यापक मधुकर गायकवाड, विजयाताई गायकवाड, संचालक भागवंत उंबरकर, उद्योजक विलास उंबरकर, माजी पंचायत समिती सदंस्य सरुनाथ उंबरकर, संचालक हरिभाऊ आहेर, सचिव भारत घोगरे, सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, शिक्षणाधिकारी एस. आर. रेठरेकर, केद्रं प्रमुख वाघ, अण्णासाहेब सारबंदे, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, विजय शेळके, मुख्याध्यपक गिरी व दिवेकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक मधुकर गायकवाड यांचा सपत्नीक सत्कांर मान्यंवराच्या हस्तें करण्यात आला.

शालिनीताई विखे पुढे म्हणाल्या की, गावामध्ये विकास कामे करत असताना ग्रामस्थाना विश्वासात व बरोबर घ्यावे. ‘ खेकडा प्रवृत्ती ’ सोडून दुरदृष्टी व ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम केल्यास विकास कामाला  कोणीही थांबवू शकणार नाही. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून गावासाठी २० लक्ष रुपयाचे डाबंरी रस्ते, भुसाळ वस्तीवरील शाळेसाठी  एक खोली व स्मशान भूमीसाठी ७ लक्ष रुपये निधी मंजुर झाला असून, लवकरचं कामे सुरु होतील अशी माहिती शालिनीताई विखे पाटील यांनी याप्रसंगी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)