मुख्याधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर बंद मागे

वाई – पालिकेने मंगळवारी धडक मोहिम राबवत मंडई परिसरातील अतिक्रमणे काढली. पालिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी बुधवारी वाई बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळपासून शंभरटक्के बंद पुकारण्यात आला होता. सकाळपासूनच सर्व व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. दरम्यान, मुख्याधिकारी विद्या पोळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत व भाजी विक्रेत्यांचे मुख्य पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर पुकारलेला बंद मागे घेण्यात आला. मुख्याधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भाजी मंडई पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात आली.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मुख्याधिकारी यांनी मंडईची व्यवस्था योग्य पद्धतीने लावण्याचे आश्‍वासन देवून भाजी विक्रेत्यांच्या मागण्या मान्य केल्याने पुकारलेला बंद मागे घेण्यात आला. त्यामुळे वाईकर नागरिकांची होणारी गैरसोय दूर होवून नागरिकांमधून समाधान व्यक्त कारण्यात आले.

बुधवारी सकाळी दहा वाजता अतिक्रमण मोहीम सुरु करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी जाहीर केले होते. परंतु वाईतील भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात एकत्र येवून मंडईत ठिय्या मांडून बसले होते. आम्हा व्यवसायिकांची बसण्याची व्यवस्था कायमची करा, दर चार महिन्यांनी होणारी अतिक्रमण मोहीम थांबवा अशी मागणी करणारे निवेदन नगराध्यक्ष यांना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भाजी व फळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष युसुफ बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत भाजी मंडई बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याची भूमिका घेतली. त्यानंतर मुख्याधिकारी सौ. पोळ यांच्याशी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व भाजी विक्रेत्यांचे प्रतिनिधी म्हणून अशोकराव गायकवाड, युसुफ बागवान, संतोष जमदाडे यांच्यात झालेल्या बैठकीत भाजी विक्रेत्यांना सर्वसोयीनीयुक्त असे बसण्याची ठिकाण तयार करून देण्याचे ठरविण्यात आल्याने भाजी विक्रेत्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)