मुख्याधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण स्थगित

सातारा,दि.13 प्रतिनिधी- नगरपालिकेत वारस हक्काने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण अखेर मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले.
दरम्यान, 16 वारसांना पालिकेच्या शासकीय सेवेत भरती करून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. बुधवारी सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद ऍड. दत्ता बनकर, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक निशांत पाटील, नगरसेवक मनोज शेंडे, मुख्याधिकारी मा. शंकर गोरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेअंती पालिकेच्या येत्या सर्व साधारण सभेत भरती करण्याच्या विषयाला मंजुरी देवून पुढील प्रक्रिया पुर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले. यानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला. मात्र, लेखी आश्‍वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा एकदा युनियन संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही असे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी सांगितले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युनियनचे कायम कामगार, घंटागाडी कर्मचारी, टेंडर कामगार यांनी पाठिंबा दर्शवला. आंदोलनामध्ये गणेश भिसे, सिध्दार्थ खरात यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)