मुख्याधिकारी विनायक औंधकर पुन्हा सातारा जिल्ह्यात रुजू

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – कऱ्हाडचे बहुचर्चित माजी मुख्याधिकारी विनायक औंधकर पुन्हा सातारा जिल्ह्यात रुजू झाले असून आज त्यांनी रहिमतपूर पालिकेत पदभार स्वीकारला. तरुण-तडफदार अधिकारी म्हणून औंधकर यांची ओळख आहे.
रहिमतपूर पालिकेतील मुख्याधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. या रिक्त जागेवर जामखेड (जि. नगर) येथून औंधकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2017 या काळात त्यांनी कऱ्हाडला काम पाहिले होते. या कालावधीत विविध कारणांनी औंधकर चर्चेत राहिले. जामखेडवरुन औंधकर यांची पुन्हा सातारा जिल्ह्यात बदली झाली आहे. रहिमतपूर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी सवाखंडे यांच्यावर कारवाई झाल्याने ते रजेवरच होते. त्यामुळे रहिमतपूर पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध होत नव्हता. मात्र जामखेडवरून विनायक औंधकर यांची थेट रहिमतपूरला बदली झाली. तसे आदेश गुरुवारी सातारा जिल्हाधिकरी कार्यालयाला प्राप्त झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)