मुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर

मेढा  – मेढा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सर्वसामान्य अतिशय संतप्त आहेत. दिवाळी रजा संपूनही मुख्याधिकारी महेश गायकवाड अजूनही कामावर रुजू न झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मेढा नगरपंचायतीला लागलेले हे मुख्याधिकाऱ्यांचे ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक वेळा तक्रारी करुनसुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

घरकुल योजनेसाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी जागेबाबत पाहणी करूनसुद्धा घरकुल योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे घरकुलधारकांना सतत हेलपाटे मारावे लागतात. वारंवार भेट घेऊनसुद्धा मुख्याधिकारी लक्ष देत नसल्यामुळे आता नेत्यांपेक्षा मुख्याधिकारी आश्वासन देत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक वेळेला लगेच काम करुन घेतो असे सांगून फसवा दिलासा दिला जात आहे.

-Ads-

वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर कमानी चौक ते चांदणी चौक या रस्त्याला मंजुरी मिळून दोन महिने होऊन गेले. त्या रस्त्यामधील अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना नोटीस बजावूनसुद्धा कुणीही अतिक्रमण काढण्याची तसदी घेत नाही आणि त्यात मुख्याधिकारी रजेवर असल्यामुळे अतिक्रमण करणारे बिनधास्त आहेत.

मुख्याधिकाऱ्यांमुळेच अनेक प्रश्न प्रलंबित

दै. प्रभातमध्ये बातमी प्रसिध्द झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ यांनी प्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की संबंधित रस्ता हा ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला असून केवळ मुख्याधिकारी गायकवाड यांच्या निष्क्रिय कारभारामुळे रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. तसेच नागरिकांनीसुद्धा आपआपले अतिक्रमण स्वतःहून काढून नगरपंचायतीला सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच आता या रस्त्याचे लवकरच काम मार्गी लागेल.
पांडुरंग बापू जवळ, उपनगराध्यक्ष


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)