मुख्याधिकारी दातीर यांची कर्मचाऱ्यांना पालिकेत नो-एंट्री

कर्मचाऱ्यावरील कारवाईचे सर्वत्र कौतुक
श्रीगोंदा – श्रीगोंदा नगरपरिषदेत दुपारी जेवणाची वेळ संपली तरी कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर होते नाही. कर्मचाऱ्यांच्या या स्वभावाला कंटाळून मुख्याधिकारी विश्वभंर दातीर यांनी आज चक्क पालिकेच्या प्रवेशद्वारलाच कुलूप लावत कर्मचाऱ्यांना नोएंट्री केली. कर्मचाऱ्यांना शिस्तप्रिय करण्यासाठी दातीर यांनी घेतलेल्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेत दुपारी जेवणाची सुट्टी ही दोन ते तीन या वेळेत असती. कार्यालयीन कर्मचारी हे शहरातीलच असल्याने ते जेवण करण्यासाठी घरी जातात. तीन वाजून गेले तरी ते कार्यालयात येत नाही. काही जण तर संध्याकाळी सुट्टीच्या वेळी तोंड दाखवायला येतात. अनेक वर्षांपासून चाललेल्या या अप्रिय कारभाराला आळा घालण्यासाठी दातीर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. पालिकेच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.
यापुढे असे प्रकार खपून घेणार नाही. उशिरा कोणी आले तर त्यांच्यावर थेट कारवाई करणार असल्याचे बजावून दातीर यांनी अखेर कुलूप उघडले. दातीर यांनी घेतलेली ही भूमिका शहरात वाऱ्यासारखी पसरली. अन त्यांनी केलेली ही अनोखी कारवाई सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)