मुख्याधिकारी चक्क 15 डिसेंबरपर्यंत रजेवर!

सातारा पालिकेत तर्कवितर्क : रजा कौटुंबिक की राजकीय

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – आपल्या अनोख्या कार्यपध्दतीमुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकणारे सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे हे चक्क 15 डिसेंबरपर्यंत रजेवर गेले आहेत. यामुळे पुन्हा चर्चांना उधाणं आले आहे. रजा कौटुंबिक कारणासाठी काढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, मात्र मंजूर झाली की नाही याची माहिती मिळू शकली नाही. यामागे नक्की काय कारणं आहे याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
गोरे यांचा रजेचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या न. पा. विभागाला प्राप्त झाला आहे. तो रजा अर्ज गोरे यांनी बुधवारीच सादर केल्याचे वृत्त आहे. या अर्जात त्यांनी पत्नी व मुलगा यांच्या प्रकृती अस्वास्थाचे कारण दिले आहे. त्यांच्या शुश्रुषा करण्यासाठी तब्बल सोळा दिवसाची रजा काढत असल्याचे त्यांनी प्रशासनाला कळवले आहे. अर्थात ही रजा अद्याप मंजूर झालेली नाही. या रजेसंदर्भात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, गोरे यांच्या घरगुती रजेचे कारण राजकीय असल्याची चर्चा आहे. गोरे यांची प्रशासन पातळीवर काही प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. काही चौकशा तर प्रांत स्वाती देशमुख यांच्यामार्फत सुरु आहे. सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांचे मधूर संबंध संपुष्टात आल्याची भावना मुख्याधिकाऱ्यांची झाल्याने ही मोठी रजा त्यांनी काढल्याचे बोलले जात आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)