सातारा- राज्याचे मुख्यसचिव दिनेशकुमार जैन यांनी शनिवारी साताऱ्याला धावती भेट देताना जिल्ह्यातील प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्यासह उप वनसंरक्षक भारतसिंग हाडा यांच्याकडून त्यांच्या खात्यातील प्रशासकीय कामाचा आढावा घेतला.

दरम्यान, शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुख्य सचिव दिनेशकुमार जैनयांचे जिल्हा शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यांचा दौरा अनौपचारिक असल्याने जिल्ह्यातील चार विभागाचे प्रमुख अधिकारी वगळता इतर विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते. मात्र, तब्बल एक तास दिनेशकुमार जैन यांनी चार ही अधिकाऱ्यांकडून प्रलंबित कामे व प्रश्‍न जाणून घेतले. त्याचबरोबर विश्रामगृहातून रवाना होताना मलिक यांनी नागरिकांच्या समस्या ही जाणून घेतल्या. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपजिल्हाधिकारी किर्ती नलवडे, तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)