मुख्यमंत्र्यांशी भेट सफल; गोटेंचा राजीनामा मागे

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी आज भाजपाला सोडचिट्ठी देण्याच्या व आमदार पदाचा राजीनामा देण्याच्या आपल्या निर्णयावरून घुमजाव केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथे भेट घेतल्यानंतर गोटे यांचे ‘हे’ मतपरिवर्तन झाले आहे.

दरम्यान गोटे आपल्या नव्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, “मी माझा जुना निर्णय बदलला असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. गुंडांना भाजपामध्ये प्रवेश नाकारणे आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांची धुरा माझ्याकडे देणे या दोन्ही अटी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यामुळेच मी पूर्वीचा निर्णय बदलत आहे.”

-Ads-

तत्पूर्वी अनिल गोटे यांनी १२ नोव्हेंबर रोजी भाजपाला व आपल्या आमदारकीला नारळ देण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)