मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्र्यांनी निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करावा, असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. एकप्रकारे पदाधिकारी, कार्यकार्त्यांना गुंडगिरी करण्याचे आदेश देण्यासारखेच आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर कलम 171 (फ)(क) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पोलिसांकडे केली आहे.

यासंदर्भात भापकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे की, भाजपचे कार्यकर्ते पालघर लोकसभा मतदार संघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुचणेनुसार गुंडगिरी करत आहेत. तसेच, खुलेआम पैसे वाटप करताना पकडले जात आहेत. आज सोमवारी (दि.28) या मतदार संघात मतदान सुरु असताना कार्यकर्त्यांनी दहशत माजवली, असा आरोप भापकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा नवा अर्थ कूट नीती असा सांगितला असला, तरी कूट नीतीने निवडणुका जिंकाव्यात असे घटनेत लिहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांवर कलम 171 (फ)(क) नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भापकर यांनी तक्रारीत केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)