मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा – नवाब मलिक

नबाव मलिक : शिवसेनेने क्‍लिपची पुंगी न वाजवता तक्रार द्यावी
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित ऑडिओ क्‍लिपवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसही आता आक्रमक झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री सरळसरळ धमकी देत आहेत. विरोधकांवर हल्ले करण्याची चिथावणीखोर भाषा वापरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केली आहे. शिवसेनेने देखील जाहीर सभेत ही क्‍लिप पुंगी म्हणून न वाजवता हिंमत असेल तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित क्‍लिप जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे स्पष्टीकरणही दिले आहे. मात्र आता विरोधकही या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची भाषा अशोभनीय आहे. विरोधकांवर हल्ले करा, मी सर्वात मोठा गुंड आहे, असे मुख्यमंत्री बोलत आहेत. त्यांची ही भाषा चिथावणीखोर आहे. निवडणूक आयोगाने ही क्‍लिप ऐकावी.

आवश्‍यकता पडल्यास खात्री करण्यासाठी ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावी आणि पोलिसांना त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजप भंडारा-गोंदियामध्ये साम-दाम-दंडभेदाचा वापर करुन पोटनिवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असून शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला गेला हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आणि भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)