मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे

मुंबई:  पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या ‘ऑडिओ क्लिप’युद्धानंतर आता दोन्ही बाजूनं वाक्‌बाण सोडण्यात येत आहेत. ‘ऑडिओ क्लिप माझीच होती, पण त्यातील शेवटचे वाक्य त्यांनी सादर केलं नाही. अन्यथा तोंडावर पडले असते,’ असे प्रत्युत्तर देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदचा अर्थ सांगावा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायलाही तयार आहोत, असं ठाकरे म्हणाले.

पालघर पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने एका ऑडिओ क्लिपद्वारे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधले होते. भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस हे निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व अस्त्रांचा वापर करण्याच्या ‘सूचना’ देत असल्याचे ऐकवणारी ही क्लिप आहे. ‘एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्याठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे’, असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावर क्लिप माझीच आहे. पण ती मोडूनतोडून शिवसेनेने सादर केली असं सांगत साम-दाम-दंड-भेदचा अर्थ कूटनिती असा होतो, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

तसेच क्लिप मोडूनतोडून सादर करणाऱ्या शिवसेनेवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर आज मुंबईत नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले. कारवाई करायची असेल तर बिनधास्त करा. पण क्लिपमधील आवाज त्यांचाच होता, हे त्यांनी कळत-नकळत मान्यही केले आहे. मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेद आणि कूटनितीचा अर्थ सांगावा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायलाही तयार आहोत, असं सांगून त्यांनी क्लिपमध्ये कशा प्रकारे छेडछाड केली ते जाहीर करावे, असे आव्हान ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)