मुख्यमंत्र्यांनी मेहता-देसाईंचे राजीनामे फेटाळले

मुंबई :  घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली.
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी राजीनामा देऊ केल्याची माहिती पुढे आली आहे, तर शनिवारी सुभाष देसाईंनीही राजीनाम्याची तयारी दाखवली. दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी वाचवले आहे. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे.
प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर विरोधकांनी विधान परिषदेत दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवाय या दोन्ही मंत्र्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. खरं तर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तातडीनं एकनाथ खडसेंचा राजीनामा घेण्यात आला होता. मात्र तोच न्याय मेहता आणि देसाईंना का लावला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)