मुख्यमंत्र्यांनी अन्य राज्यांत सरप्राईज व्हीजीट करू नयेत; केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्यांना सुचना

नवी दिल्ली – अनेक राज्यांचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांमध्ये अचानक दौरा करतात. त्यांच्या या भेटीमुळे सुरक्षाविषयक गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा सरप्राईज भेटी टाळाव्यात अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. काही वेळा अनेक मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांच्या सरकारांना न कळवताच त्या राज्यांना भेटी देत असल्याचे आढळून आले आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या संबंधात अशी गंभीर तडजोड करणे चुकीचे आहे असेही केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या सूचनेत म्हटले आहे.

सुरक्षा व्यवस्थेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपले मुख्यमंत्री ज्या राज्याला भेट देणार आहेत त्याची कल्पना मुख्य सचिवांनी संबंधीत राज्यांना देणे अपेक्षित आहे. देशातल्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना झेड किंवा झेडप्लस दर्जाची सुरक्षा आहे. या नुसार पाहुणा म्हणून येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अशी सुरक्षा पुरवणे हे संबंधीत राज्य सरकारची जबाबदारी आहे असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अशी व्यवस्था करण्यास पुरेसा वेळ मिळणे आवश्‍यक आहे त्यामुळे पुर्व कल्पना देऊनच मुख्यमंत्र्यांनी अन्य राज्यांचा दौरा केला पाहिजे असे केंद्र सरकारने म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)