मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खांडगेदरा गावाला वनग्राम पुरस्कार प्रदान

संगमनेर – शासनाच्या वनविभागाच्या संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा या गावाला मिळालेला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जागतिक वन दिनी बुधवारी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वनसमितीला प्रदान केला.

राज्य सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरु केली. वनक्षेत्रात व वनक्षेत्राच्या सीमेवर  असलेल्या 15  हजार  600गावांपैकी 12 हजार 661 गावात वनांचे रक्षण करण्यासाठी वनव्यवस्थापन समित्या स्थापन केल्या. वनविभागाचे अखत्यारीतील जंगलाच्या संरक्षण अवैध चराई व अतिक्रमण रोखण्यात मिळालेले यश वन वणव्यांचा  केलेला  प्रतिबंधक उपाय, मृद जलसंधारण व वृक्षारोपण आदी कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांसह महिला वर्गाचा सहभाग व इतर अठरा कसोट्यांचे घारगाव वन परिमंडळातील खांडगेदरा गावाच्या वनव्यवस्थापन समितीने केलेली काटेकोर अंमलबजावणी यामुळे राज्यस्तरीय समितीच्या पाहणीत १०० पैकी ९९ गुण मिळवत या गावाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता दरम्यान आज पुरस्कार वितरण करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)