मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन

काही चित्रपट रंजनासोबत समाजातील वास्तव, व्यंग अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातही प्रेक्षकांना अशाच प्रकारचे ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. गीत-संगीताचा सुमधूर साज लेऊन अॅट्रॉसिटी अॅक्टमागील सत्य ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांचे दिमाखदार प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. वेगळा विषय मांडल्याबद्दल निर्माता दिग्दर्शकाचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

आजवर नेहमीच दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक दिपक कदम यांनी ‘अॅट्रॉसिटी’चं दिग्दर्शन केलं आहे. कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातात, पण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. ‘अॅट्रॉसिटी’ हा देखील एक असाच कायदा आहे, ज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. समाजातील दुर्बल घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे यांनी आर. पी. प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘अॅट्रॉसिटी’मध्ये मांडण्यात आलेल्या वास्तववादी कथानकामध्ये मनोरंजक मूल्यांचा समावेष करीत गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी ‘अॅट्रॉसिटी’मधील गीतं लिहिली असून, संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.

राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ, निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल ही नवी जोडी या चित्रपटात असणार आहे. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, मधू कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कलाकारांच्या निवडीची जबाबदारी राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहे, तर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे. बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, विनोद बरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत. येत्या २ फेब्रुवारीला ‘अॅट्रॉसिटी’ प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)