मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रेया कंधारेचा सत्कार

पिंपरी – एशियन योगा चॅम्पियन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती श्रेया शंकर कंधारे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्रेयाच्या यशाचे कौतुक केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस शहरात आले होते. भोसरीतील लांडगे नाट्यगृहातील कौतुक सोहळ्यात महापौर नितीन काळजे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, संजय भेगडे, गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे आणि श्रेयाचे कुटुंबिय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)