मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत गोव्याचे प्रतिनिधीत्व नव्हते

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकतीच भाजपशासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक परिषद झाली. या परिषदेला प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित राहु शकले नाहीत पण त्यांच्या ऐवजी तेथे भाजपचा अन्य कोणी मंत्री प्रतिनिधी म्हणून पाठवला जाणे अपेक्षित होते परंतु तोही पाठवला गेला नाही.

पर्रिकर हे या काळात मुंबईत उपचार घेत होते. या संबंधात माहिती देताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की ही परिषद केवळ मुख्यमंत्र्यांसाठीच असल्याने गोव्याचा अन्य कोणी प्रतिनिधी तिकडे पाठवता आला नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारी साठी भाजपने ही बैठक बोलावली होती. त्याला भाजपच्या पंधरा पैकी चौदा राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)