मुख्यमंत्र्यांच्या नावाने खंडणी मागणारा तोतया अटकेत

ठाणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हुबेहूब आवाज काढत 10 कोटींची खंडणी उकळणाऱ्या तोतयाला ठाणे पोलिसांनी गजाआड केले आहे. अनुद शिरगावकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिरगावकर याने विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यासाठी ठाण्यातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली. एका महिलेने मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणे करून देत असल्याची बतावणी केली. यानंतर अनिल भानुशाली नावाच्या तिच्या साथीदाराने फोनवर मुख्यमंत्र्यांचा आवाज काढला.

यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून अनुद शिरगावकरसह एका महिलेला अटक केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोतयाने आणखीही काही जणांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)