मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ हेलिकॉप्टरही ‘यूवाय’ कंपनीचेच

मुंबई : घाटकोपर येथे काल अपघातग्रस्त झालेल्या चार्टर्ड विमानामुळे अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. यूवाय कंपनीचे हे विमान काल घाटकोपरमधील रहिवासी भागात कोसळल्यानंतर ते गुटखाकिंग कोठारी यांचे असल्याचे समजले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरही याच कंपनीचे असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दौऱ्यांसाठी वापरत असलेल्या हेलिकॉप्टरबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वारंवार अपघात तसेच उड्डाण व प्रवासामध्ये येणारे अडथळे यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर चर्चेत राहिले आहे. आता कालच्या अपघातानंतर हे हेलिकॉप्टरही यूवाय कंपनीचे असल्याचे लक्षात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरवरुन गडचिरोलीला जात असताना एकदा या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. लातूरमध्ये एकदा त्याचे क्रॅश लँडिंग झाले होते. त्यानंतर अलिबाग येथेही एका कार्यक्रमास ते गेले असताना ते हेलिकॉप्टरमध्ये आत प्रवेश करण्यापुर्वीच इंजिन सुरु झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच नाशिकवरुन औरंगाबादला जात असताना ठराविक मर्यादेपलिकडे हेलिकॉप्टरमध्ये वजन जास्त झाल्यामुळेही उड्डाणात अडथळा आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काल घाटकोपर पश्चिमेकडच्या जीवदया लेनमधल्या पृथ्वी बिल्डिंगजवळ झालेल्या या अपघातात एकूण पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता.  विमानाच्या पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांच्यासोबत पादचारी गोविंद पंडित यांचा  या अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, पायलट मारिया यांचे पती प्रभात कथुरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना खराब हवामान असतानाही कंपनीने विमानाची चाचणी घेण्यास भाग पाडले, असा आरोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)