मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला गर्भित इशारा

पिंपरी – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नरेंद्र मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी वेळप्रसंगी भाजपशी युती करणाऱ्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना शिरूर, मावळ लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देऊ. अन्यथा आमचे दोन शिलेदार तयार आहेत, अशा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला. मात्र, ही सभा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसल्याचे सांगत, या महासंमेलनातून आम्ही आमची दोन्ही लोकसभा मतदार संघातील ताकद दाखवून दिली आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

भाजपच्या अटल संकल्प महासंमेलनात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निगडी-प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी (दि. 3) हे संमेलन पार पडले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीष बापट, महापौर राहुल जाधव, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, बाबुराव पाचर्णे, योगेश टिळेकर, सुरेश हळवणकर, पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आझम पानसरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, उपमहापौर सचिन चिंचवडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या महासंमेलनाबाबत फडणवीस म्हणाले की, अनेकांनी मुघलांचे मांडलिकत्व पत्करले होते. या भूमीतच शिवाजी महाराजांनी ते मोडीत काढत सुराज्य प्रस्थापित केले. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या भूमीतच अटल महासंमेलन मावळ शिरूरमध्ये आयोजित केले, असे सांगत आतापर्यंतच्या 70 वर्षांच्या राजवटीत केवळ आपली घरे भरली. आपला परिवार आणि त्यापलिकडे काही पाहिले नाही. अशा विचारांची लढण्याची वेळ असून अशा देशविरोधी विचारांचा शिरच्छेद करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले. महापौर राहुल जाधव यांनी आभार मानले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे “मुंगेरीलाल के हसीन सपने’
फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते भ्रष्टाचारी, अनाचारी व दुराचारी आहेत. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. जनता या दोन्ही पक्षांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले तरी भाजपला काही परक पडणार नाही. हे दोन्ही पक्ष पुन्हा सत्ता मिळविण्याचे दोन्ही पक्षांचे मुंगेरीलाल के हंसीन सपने असून हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याची टीका केली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने खुल्या व्यासपीठावर येऊन चर्चा करावी. यात उजवा ठरलो नाही, तर निवडणूक लढविणार नसल्याचे खुले आव्हान त्यांनी यावेळी दिले. सिंचन घोटाळ्यातून स्वत:ची घरे भरल्याची टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली.

अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक – दानवे
सिंचन घोटाळाप्रकरणी न्यायालयाने आदेश दिले आहेत. माजी उपमुख्यमंत्र्यांच्या सिंचन घोटाळ्यातील सहभागामुळे आज पोलीस त्यांच्या दारात उभे आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)