“मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्यांना जगातून गायब करू’

मध्यप्रदेशातील भाजप खासदाराची गर्भित धमकी

भोपाळ – मध्यप्रदेशात विरोधी पक्षावर टीका करण्यात आघाडीवर असणारे भाजप खासदार मनोहर उंटवाल यांनी विरोधकांना गर्भित धमकीच दिली आहे. “आमच्या मुख्यमंत्र्याचा शिवराज सिंह चौहान यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही जगातून गायब करण्याची ताकद ठेवतो, असे ते म्हणाले आहेत.

उंटवाल यांनी काही दिवसांपूर्वीच दिग्विजय सिंह यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही पायात ठेवतो. तर आमच्या मुख्यमंत्र्यांचा जो अपमान करेल त्याला जगातून गायब करण्याची ताकद आमच्याकडे आहे, असा धमकी वजा इशाराच उंटवाल यांनी दिला आहे.

हे वक्तव्य नेमके कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणासाठी होते याचा खुलासा त्यांनी केला नाही. मात्र, देशात सुरू असलेल्या सामूहिक बलात्कारांमुळे विरोधक पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. त्यामुळे उंटवाल यांनी लगावलेला टोला विरोधकांनाच होता अशी चर्चा सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)