मुख्यमंत्री व चंद्रकांतदादांमुळे आरक्षण मिळाले : अनिल देसाई

दहिवडी : जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करताना अनिल देसाई, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

गोंदवले, दि. 4 (प्रतिनिधी) – राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्यांचे सर्वसामान्यांमधून स्वागत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धाडसी निर्णय व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने आरक्षण मिळाले असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केले. दरम्यान, या निर्णयाबद्दल दहिवडी येथे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्यावतीने फटाके फोडून जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, जिल्हा नियोजन सदस्य बाळासाहेब खाडे, धिरज दवे, डॉ. विजय पाठकआण्णा, दादासाहेब शिंदे, बापूसाहेब साखरे, समीर ओंबासे, दादा दडस, रफिक मुलाणी, अजित बोराटे, अतुल जाधव, संदीप भोसले, पिंटू जगदाळे, बालेखान मुलाणी, आदी उपस्थित होते.
अनिल देसाई म्हणाले, भाजप सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेवून शब्द पाळला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने मराठा समाजातील मुलांना नोकऱ्या उपलब्ध होवून कुटुंबांचे राहणीमान उंचावणार आहे.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)