मुख्यमंत्री योगी यांच्यासह पंतप्रधान मोदींचा लखनऊत योगाभ्यास

नवी दिल्ली, दि. 20-बुधवारी आंतरराष्ट्रीय योगा दिन सजरा करण्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आणि 51 हजार सहभागी यांच्यासह योगाभासाची प्रात्यक्षिके करणार आहेत. उत्साही सहभाग्यांमध्ये अनेक मान्यवर, राजकारणी आणि नोकरशहांचा समावेश आहे. लखनऊ येथील रमाबाई आंबेदकर सभास्थळी होणाऱ्या या योगाभ्यासाच्या कार्यक्रमाची तयारी गेला महिनाभर चालू आहे.
भारतात सुमारे 5,000 वर्षांपूर्वी आरंभ झालेल्या योगाचे महत्त्व संपूर्ण जगाला माहीत करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगा दिना साजरा करण्याची सुरुवात 3 वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. नेदर्लंड्‌स, त्रिनिदादस्‌ आणि टोबॅको आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर योगा दिन साजरा करण्यात येत आहे. अनेक एनजीओज आणि योगा गुरू यांनी यासाठी शिबिरांचे आयोजन केलेले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी स्वत: लक्ष देत आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाने 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जाहीर केला. 21 जून 2015 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात देशभरातील 20 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींनी, तर केवळ दिल्लीमध्ये 37 हजार व्यक्तीनी भाग घेतला होता.
21 जून रोजी सकाळी 6 वाजता योगा दिन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)