मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केले अवैध कत्तलखाने सील

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासांच्या आतच योगी आदित्यनाथ यांनी सर्वात मोठे पाऊल उचलले असल्याचे दिसत आहे. कारण योगींनी अलाहाबादमधील दोन अवैध कत्तलखाने सील केले आहेत.
रविवारी रात्री करेली पोलिसांनी अटाला आणि नैनीतल्या चकदोंदी मोहल्ल्यातल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केली. उत्तर प्रदेशात 250 च्यावर अवैध कत्तलखाने आहेत. कागदावर हे कत्तलखाने बंद केले असे दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र रोज शेकडो जनावरांची कत्तल इकडे होत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी भाजपने अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)