मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत ?- जयंत पाटील

मुंबई: “यावर्षीच्या पावसाळ्यात राज्यात सरासरी ७७ टक्केच पाऊस झाला असून २०१ तालुक्यांतील २० हजार गावांत दुष्काळसदृश्य परिस्थतीत निर्माण झाली आहे. मराठवाडा व इतर महाराष्ट्रात इतकी भीषण परिस्थती निर्माण झाली असताना मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत ?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळायचे आहे का ? केंद्रीय पथकाला तातडीने पाहणी करायला सांगून दुष्काळ जाहीर करून नागरिकांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक आहे. जवळपास २०० तालुक्यांतील पाणीटंचाई दिवसेंदिवस अत्यंत भीषण होत चालली आहे”

-Ads-

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, दुष्काळग्रस्त गावांत रोज टँकरने पाणीपुरवठा करावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात व दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्या देखील जयंत पाटील यांनी केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)